• Home
  • क्राईम
  • महसूल गुप्तचर संचालनालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले
Image

महसूल गुप्तचर संचालनालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले

प्रतिनिधी

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट, भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील 8.230 किलो सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 4.54 कोटी रुपये इतकी आहे.

जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते, त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणाऱ्यांना आळा घालण्याच्या आव्हानात्मक कामगिरीसाठी डीआरआयचे अधिकारी अवलंबत असलेली अनोखी कार्यपद्धती यामधून सूचित होते.

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. देशात अवैध मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडून काढण्याच्या दृष्टीने, या प्रकरणाचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे.

Releated Posts

एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्कातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट ४ ची अटक

प्रतिनिधी पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने एका मोठ्या कारवाईत एक वर्षापासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील पाहिजे…

ByBymnewsmarathi Jun 9, 2026

रांजणगाव MIDC मध्ये देहव्यापारावर धाड; सात महिलांची सुटका, दोन अटकेत

प्रतिनिधी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत एका लॉजिंगमध्ये चालणाऱ्या देहव्यापाराचा पर्दाफाश केला…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

जुन्नर तालुक्यात दुहेरी हत्याकांड, रात्रीत होत्याच नव्हत झालं..

प्रतिनिधी जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ गावच्या हद्दीत बगाडवाडी येथे तळेरान गावच्या शिवेवर राहत असलेल्या मुकने कुटुंबात अत्यंत…

ByBymnewsmarathi Jun 3, 2026

बारामती तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांकडून अवैद्य दारू विक्रेत्यांची धरपकड. हे उशिरा सुचलेले शहाणपण? यामुळे नागरिकांमध्ये वेगळ्याच चर्चा.

संपादक – मधुकर बनसोडे. काही दिवसांपूर्वीच पुणे शहरामधील हडपसर येथे भेसळयुक्त दारू पिल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या…

ByBymnewsmarathi Jun 2, 2026