मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Friday, 9 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

पत्नी नांदायला आली म्हणून पती समवेत दीर व सासू-सासर्‍यांनी केली मारहाण वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.

mnewsmarathi 23 Jan 2023 1 मिनिट वाचन 9,565 वाचन

प्रतिनिधी- फिरोज भालदार .

 सुपे ता. बारामती जि. पुणे या ठिकाणी दि. 20.1.2023 रोजी सना ह्या त्यांची आई सोबत सुपे येथे सासरी नांदायला आले यावेळी सासू आसिफा इसाक शिकलगार व सासरे इसाक अब्बास शिकलगार यांनी सना ह्यांला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली तसेच रात्री 9 वा.

सुमारास सनाचा पती परवेज इसाक शिकलगार याने पत्नी सना हिला तुझी हिम्मत कशी झाली येथे यायची असे म्हणून सना हीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेऊन जमिनीवर आपटून फोडून टाकला व सना यांच्या डोक्यात डाव्या बाजूस लाकडी दांडक्याने मारहाण केली व दीर तय्यब व इम्तियाज शिकलगार हे दोन्ही दिरांनी लाकडी दांडक्याने सणा ह्यांच्या दोन्ही पायावर मारहाण करुन व सणाच्या आईला तू सोडवण्यासाठी कश्याला आली म्हणून त्यांला सुद्धा ढकलून देऊन असिफा शिकलगार व इसाक शिकलगार यांनी सनाची आई अफसर ह्यांस हाताने मारहान करून शिवीगाळ केली. म्हणून सना यांनी पती परवेज इसाक शिकलगार,दीर तय्यब, इम्तियाज ,सासू असिफा इसाक शिकलगार ,व सासरा इसाक अब्बास शिकलगार सर्व रा. सुपे ता. बारामती जि. पुणे यांच्याविरुद्ध सुपे येथे फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन ने गुन्हा दाखल केला आहे .

 पुढील तपास स. फौ. शेंडगे हे करीत आहेत .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi