• Home
  • सामाजिक
  • जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला : सुधीर मुनगंटीवार
Image

जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला : सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी

विधान सभेचे माजी उपाध्यक्ष ऍड.मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला आहे, अशा शब्दात चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात ते पुढे म्हणाले की ऍड.मोरेश्वर टेमुर्डे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विवेकानंद हिंदू ज्ञानपीठ या संस्थेच्या माध्यमातून शाळांचे जाळे उभे करून शिक्षण प्रसारास मोठा हातभार लावला. ते शरद पवारांचे निकटवर्ती विश्वासू म्हणून परिचित असले तरीही त्यांची राजकारणात प्रामाणिक राजकारणी म्हणून ख्याती होती. ते स्वतंत्र विदर्भाचे समर्थक होते. वरोरा भद्रावती मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात त्यांनी एकेकाळी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. नंतरच्या काळात त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला होता आणि पॉंडेचेरीच्या योगी अरविंद आश्रमाचे ते अनुयायी बनले होते. त्यांच्या रूपाने भारतीय संस्कृतीकडे कल असलेला एक सरळ प्रामाणिक राजकारणी आपण गमावला आहे.

ईश्वर ऍड.मोरेश्वर टेमुर्डे यांना सद्गती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025