संपादक मधुकर बनसोडे.
ऑक्टोबर संपण्याची वेळ आली तरी काही केल्या पाऊस थांबेना. या दिवसात नागरिकांना स्वेटर घालावा लागतो त्या दिवसात रेनकोट घालण्याची वेळ आज आलेली आहे या नको असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाला आलेले पीक आज मातीमोल होत आहे. भविष्यात सहा महिने पावसाळा पाहवा लागतोय? कि काय अशी परिस्थिती झाली आहे साखर कारखाने सुरू झाले काही दिवस तोडी बसल्या मात्र या बदलत्या हवामानामुळे व पावसाच्या लहरीपणामुळे चालू तोडी बंद करण्याची वेळ ऊसतोड मजुरांवर ती आलेली आहे. पाऊस असाच चालू राहिला तर भविष्यात ऊस गाळपाचे नियोजन साखर कारखाने करू शकणार का? पावसाच्या या लहरीपणामुळे आलेल्या ऊसतोड मजुरांवर ती उपासमारीची वेळ आलेली आहे? कधी थांबणार पाऊस याकडे शेतकरी डोळे लावून बसलेला आहे.
दिवाळीचे दिवे तरी लावून देणार का का यंदाची दिवाळी देखील पावसाळ्यातच होणार. ऊस,सोयाबीन, मक्का, कोबी, अशा अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कदाचित या वर्षी सेटर घालायला मिळणार का नाही अशी मिश्किली केली चर्चा नागरिकांमधून होत आहे.