महाराष्ट्र आणि गोव्याच्या कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स कार्यालयाकडून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पदयात्रा आणि स्वच्छता मोहीम

Uncategorized

प्रतिनिधी

“स्वच्छता ही सेवा” विशेष मोहीम 2.0 च्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या दूरसंवाद मंत्रालयाअंतर्गत कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स (CCA), महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयाने 17 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबईत जुहू चौपाटी येथे पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. संचार लेखा नियंत्रक-महाराष्ट्र आणि गोवा कार्यालयातील सर्व अधिकारी या जनजागृती उपक्रमात सहभागी झाले होते.

कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स(महाराष्ट्र आणि गोवा) विभा गोविल मिश्रा यांनी जुहू टेलिकॉम कॉम्प्लेक्स येथील संचार लेखा नियंत्रक कार्यालयातून या पदयात्रेला दुपारी 3.30 वाजता हिरवा झेंडा दाखवला. जॉईंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स रश्मी आर डी आणि डेप्युटी कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स आर एस वारंग यावेळी उपस्थित होते. सर्व आवश्यक सूचना आणि कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून पदयात्रा नियोजित मार्गावरून निघाली. पदयात्रेदरम्यान अधिकाऱ्यांनी जनजागृतीसाठी विविध घोषणा, संदेश आणि फलक प्रदर्शित केले.

पदयात्रेचा समारोप जुहू चौपाटीवर झाला. अधिकाऱ्यांनी जुहू समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत उत्साहाने भाग घेतला आणि “स्वच्छता ही सेवा” विशेष मोहीम 2.0 चा संदेश दिला. सामान्य जनतेनेही अधिका-यांना सक्रिय पाठिंबा दिला आणि स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स(महाराष्ट्र आणि गोवा) विभा गोविल मिश्रा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे पालन करण्याचे आवाहन केले.

पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेमुळे सर्व सहभागींमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स (महाराष्ट्र आणि गोवा) कार्यालयाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने आणि मुंबई पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मिळालेल्या आवश्यक सहकार्याने स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले.