काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे

Uncategorized

प्रतिनिधी

काँग्रेसचे निर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 26 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत. काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी ही घोषणा केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा ६,८२५ मतांनी पराभव केला. काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गे आणि थरूर हे उमेदवार होते. खरगे यांना 7,897 मते मिळाली, तर थरूर यांना 1,072 मते मिळाली.निवडणुकीत 9,385 मते पडली, त्यापैकी 416 अवैध ठरली.

निवडणूक निकालाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच थरूर यांनी आपला पराभव मान्य केला होता. एका निवेदनात थरूर म्हणाले, “अंतिम निकाल खर्गे यांच्या बाजूने लागला, काँग्रेसच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. काँग्रेसचे अध्यक्ष होणे ही अत्यंत सन्मानाची, जबाबदारीची बाब आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांचे निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन.” यशाबद्दल अभिनंदन.”काँग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांनीदेखील मल्लिकार्जुन खर्गे यांना शुभेच्छा दिल्या