प्रतिनिधी
डॉक्टर विद्या शांताराम शिंदे वय 62 वर्ष राहणार शास्त्रीनगर येरवडा या 1994 साली बारामती मध्ये डॉक्टरचा व्यवसाय करायचा त्यावेळी भावी आयुष्यातील बचत म्हणून त्यांनी बारामती शहरामध्ये 582 चौरस मीटरचा प्लॉट विकत घेतला त्यानंतर डॉक्टर व्यवसाय निमित्त त्या पुण्याला स्थलांतरित झाल्या. नंतर बारामती शहराचा विस्तार वाढत गेला जमिनीचे भाव हळूहळू वाढत गगनाला भिडले. त्यांना वाटलं आपला प्लॉट बारामती मध्ये सुरक्षित आहे
इसम नामे मंगेश विलास काळे राहणार गोपाळवाडी दौंड याच्या लक्षात आलं की डॉक्टर विद्या शिंदे या पुण्याला स्थलांतरित झालेले आहेत आणि प्लॉट कडे त्यांचं विशेष लक्ष नाही. त्याने याचा फायदा घेत विद्या शांताराम शिंदे यांच्या नावे रंजना दत्तात्रय गार्डी वय 60 राहणार वेडणी तालुका फलटण यांना डॉक्टर विद्या शिंदे म्हणून उभे करून हवेली दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये यांच्याकडून स्वतःच्या नावावर बनावट कुलमुखत्यारपत्र करून घेतले नंतर त्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारावर बारामती मध्ये विद्या शांताराम शिंदे यांचे कुलमुखत्यार धारक मंगेश विलास काळे यांच्या वतीने स्वतःच्या नावावर संपूर्ण खरेदीखत दुय्यम निबंधक कार्यालय बारामती मध्ये केले
आणि मग बारामती शहरामध्ये प्लॉटिंग एजंटच्या मार्फत सदरचा प्लॉट त्याला विकायचा आहे अशी जाहिरात सुरू केली. आणि सोशल मीडियावरील जाहिरात बघून मग फिर्यादीला कुणीतरी जुन्या ओळखीने सांगितले की त्यांचा प्लॉट मंगेश काळे यांना कधी विकलेला आहे ज्यांनी फोन करून सांगितले त्यांना तो प्लॉट विद्या शिंदे यांच्याकडून घ्यायचा होता परंतु त्यांनी विक्रीस नकार दिलेला होता त्यालाही शंका आली की शिंदे मॅडमनी तो प्लॉट मंगेश शिंदे ला कसा विकला म्हणून त्याने त्यांना फोन केला त्यावेळेस त्यांनी सांगितले की त्यांचा प्लॉट अद्यापही विकलेला नाही त्याचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडे आहेत नंतर त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी जाऊन खात्री केली असता बनावट कुलमुखत्यार पत्र पुण्यात बनवून त्याचे आधारे मंगेश विलास काळे यांनी संपूर्ण खत खरेदी खत करून प्लॉट विक्रीचा प्रयत्न केलेला आहे नंतर त्यांनी दुय्यम प्रत दुय्यम निबंधक कार्यालयातून काढली तसेच मंगेश विलास काळे यांनी त्या खरेदी खताचा वापर करून प्रॉपर्टी कार्डवर फेरफार नोंद करून स्वतःच्या नावावर सातबारा सुद्धा करून घेतलेला होता.
आणि मग त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या व्यक्तींचा काही पत्ता बारामतीचा नसल्याने मंगेश विलास काळे व त्यांनी उभी केलेली डमी रंजना दत्तात्रय गार्डी या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या सूचनेप्रमाणे
निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले कल्याण खांडेकर व अजय देवकर हे करत आहेत.
बारामती मध्ये किंवा आसपासच्या परिसरात ज्यांनी खूप वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेले आहेत त्यांनी अधून मधून दुय्यम निबंध कार्यालय व तलाठी महसूल यांच्याकडे चौकशी करून खात्री करत जावी कारण सध्या जमिनीचे भाव वाढत आहेत आणि त्याच्यातून अशी फसवेगिरी होत आहे ही फसवेगिरी दाखल झाल्यानंतर आरोपी पण अटक होत आहेत परंतु परत खोटे केलेले खरेदीपत्र उलटून परत स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी खर्च येतो फी भरावी लागते आणि मनस्ताप प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो परत सिव्हिल लिटिलेशन सुरू होते. आणि काही एजंट लोक याचा फायदा घेत आहेत. तसेच स्वस्तात जमीन मिळत असेल तरी सुद्धा घेणार नाही विचार करावा कारण जे स्वस्त मिळतं त्याच्यामध्ये शंका असते आणि मग ती जर त्याने स्वस्तात विकत घेतली नंतर त्याचे पैसे वसूल होणे अवघड असते म्हणून विकत घेणार आणि सुद्धा विचार करावा तरी सर्वांनी आपल्या प्रॉपर्टी च्या बाबतीत जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे.