• Home
  • माझा जिल्हा
  • शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रत्नदीप पब्लिक स्कूल बस्तवडे शाखेचे उत्साह पूर्वक वातावरणात उद्घाटन.
Image

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रत्नदीप पब्लिक स्कूल बस्तवडे शाखेचे उत्साह पूर्वक वातावरणात उद्घाटन.

 प्रतिनिधी

आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी रत्नदीप पब्लिक स्कूल बस्तवडे येथे, सरपंच रघुनाथ चव्हाण व उपसरपंच अरुण भाऊ यांच्या हस्ते स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर सोसायटीचे माझे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ महिलाउपस्थित होते. उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी बालचमुनच्या हस्तेफीत कापून उद्घाटन समारंभ अगदी प्रसन्नपूर्वक वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटनाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांनी यावेळी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेचे चेअरमन श्री प्रवीण गोडबोले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक वृषाली धेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंदानी आयोजन अत्यंत कुशल पद्धतीने केलेली दिसून येते. नवीन शिक्षकांच्या हस्ते मुलांचे औक्षण आणि स्वागत समारंभ सोहळा पालकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

उपस्थित मान्यवर ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करून रत्नदीप पब्लिक स्कूल बसतवडे मार्फत सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026