टाळ मृदुंगाच्या गजरात संत सोपान काका महाराज पालखीचे बारामती तालुक्यातील निंबुत येथे जंगी स्वागत.

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे

 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निंबूत येथे संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीचे आज पाच वाजता आगमन झाले.

 यावेळी बा.सा. काकडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम वाजवत पालखीचे स्वागत केले पालखीतील प्रत्येक विणेकऱ्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्यावतीने केळी, व चहा वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मा. आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे. मा चेअरमन शहाजीराव काकडे. सोमेश्वर चे संचालक अभिजीत काकडे, गौतम काकडे, सरपंच निर्मला काळे, उपसरपंच अमर काकडे ग्रामपंचायत सदस्य, नींबूत ग्रामस्थ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून जवळपास 300 ते 400 फिरते स्वच्छालय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

 अशी देखील माहिती यावेळी देण्यात आली. आरोग्य विभागाकडून देखील या ठिकाणी कॅम्प लावण्यात आलेला होता. तसेच महावितरण अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.