• Home
  • माझा जिल्हा
  • जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत
Image

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत

प्रतिनिधि

 ‘हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ‘ अशा भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘ज्ञानोबा- माउली तुकाराम’ च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले.

मौजे खराडेवाडी येथे प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. यावेळी तहसिलदार गणेश शिंदे, दौंडचे तहसिलदार अरुण शेलार, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, दौंडचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            *प्रशासनातर्फे वारकऱ्यांसाठी सुविधा*

बारामती तालुक्यात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम उंडवडी गवळयाची व बारामती शहरात शारदा प्रांगण या ठिकाणी असतो. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रशासन, बारामती नगरपरिषद, पंचायत समिती, पोलीस विभाग, आरोग्य विभागाच्यावतीने तयारी केली आहे. पाणी, विज वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, फिरते सुलभ शौचालय, कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे सूचनाही देण्यात येत आहेत.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026