प्रतिनिधी – फिरोज भालदार
शेतकरी,कष्टकरी,विधीज्ञ,महिला,युवा-युवती यांच्या प्रवेशांची गावोगावी चर्चा. पार्टीचे किसान सेल चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम साहेब आणि बी .जी देशमुख साहेब पुणे विभाग
नेतृत्वाखाली , महाराष्ट्र शिवशाही माथाडी आणि जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक व कामगार नेते गजानन (भाऊ) भगत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये १६/०६/२०२३ रोजी फलटण शासकीय विश्रामगृह येथे जाहीर प्रवेश करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी बूथ तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्रजी गावडे,गोखळी , वंचित बहुजन विधी आघाडीचे प्रमुख श्री.आनंदजी सोनवणे, बीआरएस पक्षाचे वाढता पक्ष विस्ताराला तेलंगणा राज्यातील राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा भरभक्कम आधार. महाराष्ट्रातील इतर पक्ष, पुढाऱ्यांना बसणार झटका. महाराष्ट्रभरातील अनेक दिग्गज नेते , सामाजिक,राजकीय, शेतकरी चळवळीतील कार्येकर्त्यांचा बीआरएस मध्ये प्रवेश. तेलंगणा राज्याच्या अभ्यास दौर्यामुळे कल्याणकारी योजना व कार्याची गावागावात चर्चा. शेतकरी, कष्टकरी, मजुरांना हवे आता महाराष्ट्रातील राजकारणासह सत्ता परिवर्तन.
तेलंगणा राज्याचे मा. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिलेला “अबकी बार किसान सरकार” हा नारा सर्वसामान्यांचे मनातला क्रांतीकारी, कल्याणकारी नारा .
२५५ फलटण तालुका कोरेगाव विधानसभा मतदारसंघ समन्वयक,भारत राष्ट्र समितीचे नेते गजाननभाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली आजपासून फलटण तालुक्यामध्ये भारत राष्ट्र समितीच्या प्रवेशाला सुरुवात झाली.
यावेळी राजेंद्र गावडे-गोखळी,आनंद सुर्यकांत सोनावणे,श्रेयस सुतार- निरगुडी,अँड प्रकाश जाधव-गिरवी,संजय गायकवाड,विजय गायकवाड,ज्ञानेश्वर वाणी,दत्ताञय कदम-राजुरी राहूल मदने- उपळवे कुमार रिटे – निंबळक, अनिकेत शिंदे – टाकळवाडे रोहिदास मसगुडे-आंदरुड, राकेश कदम, चेतन काकडे,सम्यक काकडे,सागर काकडे, हर्ष खलाटे-फलटण यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये सभासद नोंदणी करुन प्रवेश केला.
यावेळेस के. चंद्रशेखर राव हे नेते नसून मसिहा आहेत.लवकरच फलटण तालुक्यातील बंधू व भगिनींना तेलंगणा पँटर्न जवळून बघण्यासाठी तेलंगणा अभ्यास दौरा करणार असल्याचे यावेळी गजाननभाऊ भगत यांनी नमूद केले.