प्रतिनिधी
सोमेश्वरनगर – येथील मु.सा काकडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या आर.एन.बापू शिंदे सभागृहात योग प्रशिक्षक सुधीर साळवे यांनी मार्गदर्शन करताना योगासने केल्याने शरीर निरोगी राहते योगाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो.रोज योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार दूर राहतात. वाढता ताणतणाव आणि जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर योगाने मात करता येते. योगासने केल्याने शरीर मजबूत होते. योगामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते .
या वर्षी योगा फोर ह्युमिनिटी (Yoga for Humanity) ही थीम निवडण्यात आली मानवतेसाठी योग ही थीम लक्षात घेऊन यावर्षी जगभरात योग दिन साजरा करण्यात आला.साळवे सरांनी उभ्या स्थितीतील आसने, बैठ्या स्थितीतील आसने,झोपलेल्या स्थितीतील आसने सप्रात्याशिक घेऊन त्याचे आरोग्यावर व जीवनात होणारे फायदे याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उस्फूर्त सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीशभैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी केले व प्रा.दत्तराज जगताप यांनी आभार मानले.