प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या युगात विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर अध्यात्म जोडीला हवे यासाठी वाणेवाडी पंचक्रोशीतील चार शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आत्मसाक्षात्काराचा अनुभव बारामती ,साखरवाडी आठफाटा होळ सहजयोग केंद्राच्या साधकांनी विद्यार्थ्यांना दिला.
आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांना अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये उरली नाही. मन एकाग्र होत नाही तणातणावा पासून ते मुक्त व्हावे .आपले आयुष्य सुखा समाधानात जगू शकतील म्हणून छोटासा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना स्वत्वाची जाणीव व्हावी. यासाठी वाणेवाडी पंचक्रोशीतील न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी( प्राचार्य कांबळे सर) जि. प .प्राथमिक शाळा वाणेवाडी (सौ कदम मॅडम) न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी भाग शाळा मुरूम (प्राचार्य श्री कांबळे सर) प्राथमिक शाळा मुरूम (सौ घाडगे मॅडम) यांनी सहज योग आत्मसाक्षात्कार व कुंडलिनी जागृती कार्यक्रमचे नियोजन करून मोलाचे सहकार्य केले त्यात बारामती सहज योग सेंटरच्या झोनल. सौ जोशी सुप्रिया श्री रामलिंग ताबे ,सौ दिपाली सानप व टीम आठफाटा होळ या सहज योगी सेंटरच्या प्रमुख सौ ज्योती गाढवे व त्यांची टीम तसेच साखरवाडी सहज योग सेंटरचे सहजयोगी श्री तुळशीदास माळवदकर ,सौ मेघना शिंदे व त्यांची टीम यासर्वांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार देऊन कुंडलिनी जागृती केली