सोमेश्वर देवस्थान करंजे कातिॅक स्नान निमित्त

Uncategorized

प्रतिनिधी

कातिॅक स्नान निमित्त

सोमवार दिनांक 7/11/2022 रोजी सालाबाद प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी 3 वाजता सोमेश्वर पालखी प्रस्थान वाजत गाजत उघड्या मारूती जवळ जाईल.तेथे गोपाळकाला होईल. 5:30 वाजता भंडारा कार्यक्रम महाप्रसाद होईल व तसेच सोमेश्वर भाविक श्री बाळासो नामदेव वायाळ होळ (आठ फाटा)यांनी देवस्थान चरणी 51000 हजार रूपये खर्च करून बैठक व्यवस्था बाकङी दिलेली आहेत.त्याबद्दल त्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते स्वागत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला मा.श्री पुरूषोत्तम जगताप चेअरमन सोमेश्वर कारखाना.मा.श्री संभाजीनाना होळकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बारामती मा.श्री प्रमोदकाका काकङे बांधकाम व आरोग्य सभापती जि.प.पुणे.मा.श्री राजवर्धन शिंदे मा चेअरमन सोमेश्वर कारखाना.मा.श्री.आप्पासाहेब गायकवाड मा.पंचायत समिती सदस्य बारामती.मा.श्री रूपचंद शेंङकर मा.श्री संग्रामभाऊ सोरटे व ॠषीआबा गायकवाड संचालक सोमेश्वर कारखाना उपस्थित राहणार आसून तरी आपण सर्व सोमेश्वर पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

सोमेश्वर देवस्थान मध्ये स्थानिक भाविकांच्या वतीने महिनाभर काकङ आरती केली जाते.काकङ आरती सकाळी 5:15 वाजता चालू होते.परिसरातील पुरूष महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आसतो.

काकङ आरतीचा सांगता कार्यक्रम मंगळवार दिनांक 8/11/2022 रोजी पहाटे 5:15 वाजता मंदिरां मधून फटाक्याची आतिषबाजी करत काकङा पाण्यामध्ये सोडण्या करिता भाविक निघतात.व चिंदादेवी येथील तळ्याच्या पाणी पातळीत मोठ्या उत्साहाने काकङा सोङून शेवट होतो.परिसरातील 2000 हजार च्या आसपास भाविक उपस्थित राहतात.तरी सर्वांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी