• Home
  • माझा जिल्हा
  • अजितदादा म्हणजे कामाचा माणूस; आम्ही जनरल पब्लिक आम्हाला तुमच्या बद्दल आदर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जनतेच्या भावना;
Image

अजितदादा म्हणजे कामाचा माणूस; आम्ही जनरल पब्लिक आम्हाला तुमच्या बद्दल आदर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जनतेच्या भावना;

प्रतिनिधी

 वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांना सांगतात “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा”… आज वंदे भारत ट्रेनमध्ये अशाच अनेकांच्या भावना होत्या.

 शनिवारी (दि.15 जुलै) नाशिक येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत ट्रेनने सकाळी नाशिककडे रवाना झाले. नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला.

मात्र या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा”… अशा शब्दात त्यांनी जणू राज्यातल्या जानेतेचीच प्रतिनिधीक भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा असे सांगत आपल्या सोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना आपल्या सुरक्षा राक्षकांना केल्या. अशा प्रकारे वंदे भारत ट्रेनने अजितदादांची क्रेझ अनुभवली.

Releated Posts

खांडज ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय : यात्रा यंदा साध्या पद्धतीने

सहसंपादक- अक्षय थोरात खांडज गावातील वार्षिक खंडेश्वरी माता यात्रेबाबत यंदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक २२ फेब्रुवारी…

ByBymnewsmarathi Feb 22, 2026

सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांभोवती संशयाचे सावट? अफवा की वास्तव — खाद्यसुरक्षा विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!!!!

  संपादक- मधुकर बनसोडे सोमेश्वर परिसरातील नॉनव्हेज हॉटेलांबाबत सुरू असलेल्या भेसळ चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता वाढत आहे.…

ByBymnewsmarathi Feb 21, 2026

बारामती तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकराज?

प्रतिनिधी बारामती तालुक्यातील फेब्रुवारी 2026 अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली? असून संबंधित ग्रामस्थांमध्ये विविध…

ByBymnewsmarathi Feb 13, 2026

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026