सोमेश्वर देवस्थान दानशूर शिवभक्तांने श्रध्देपोटी केली आसन व्यवस्था या कार्यक्रमाला सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप जि.प.बाधकाम व आरोग्य सभापती प्रमोदकाका काकङे पंचायत समिती बारामती मा सदस्य आप्पासाहेब गायकवाड सोमेश्वर संचालक संग्रामभाऊ सोरटे ॠषीआबा गायकवाड चौधरवाङी मा सरपंच यादवराव शिंदे तानाजीराव भापकर सुखदेवराव शिंदे करंजे मा सरपंच प्रकाशराव मोकाशी महेंद्र गायकवाड रामभाऊ शेलार विश्वस्त बाळासो भांङवलकर उपस्थित होते.दानशूर शिवभक्त ज्यांनी सोमेश्वर देवस्थानला आसन व्यवस्था अर्पण केली.बाळासो नामदेव वायाळ यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.देवस्थानला श्रध्देपोटी भरीव दान शिवभक्त करीत आसतात.परंतू विश्वस्त मंङळ गांभीर्याने घेत नाही.आजचा कार्यक्रम हा देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.परंतु विश्वस्त मंङळ उपस्थित नव्हते.विश्वस्त मंडळाला पुर्व कल्पना दिलेली होती.ट्रस्ट विश्वस्त देवस्थान बाबतीत कोणताही विषय गांभीर्याने घेत नाही.देवस्थान आज विकास करून देखील भकास होताना दिसत आहे.कुचकामी विश्वस्त मंङळ याची त्याची जिरवण्यात व्यस्त आहे.आज सोमेश्वर कारखाना चेअरमन साहेब व आदरणीय प्रमोदकाका देवस्थानची विकास कामांची पहाणी करण्या करिता बोलवण्यात आले होते.कारण देवस्थान मंङप व ङाईनिंग हाॅल भक्त निवास कार्यालय हाॅल निकामी होण्याच्या मार्गावर आहे.पावसाळ्यात बर्याच ठिकाणी लिकेज होत आहे.त्यामुळे बांधकामा मध्ये पाणी मुरत आहे.परंतु विश्वस्त मंङळ उपस्थित नव्हते.फक्त नावासाठी यांनी विश्वस्त मंङळाची जागा आङवली आहे. देवस्थान कारभार ढिसाळ पध्दतीने चाललेला आहे.देवस्थानची भांङी लावलेले बल्प लंपास होत आहेत.आज कातिॅक स्नान भंडारा आसताना देखील कोणीही विश्वस्त हजर नव्हते.भाविकांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिवाजी शेंङकर यांनी मानले.