प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यातील तिवळी येथील जिल्हा परिषद शाळेत पावसाळ्यात शाळेच्या संपूर्ण आवारात पावसाचे पाणी नेहमीच साचले जाते
त्याच पाण्यातून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सरपंच, सचिव, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी याबाबत दखल घ्यावी.
दररोज विद्यार्थ्यांना पाण्यातून शाळेत जावे लागते. संपूर्ण जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पाणी भरलेले असते त्यामुळे दररोज शाळेत ये-जा करतांना पाण्यातूनच वाट काढावी लागते,
याबाबत विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ होऊ नये अशी आर्त हाक स्थानिक पालकांच्या तोंडून निघत आहे.येथे वर्ग १ ते ७ पर्यंत आहेत .तरी याबाबत शाळेचे मुख्याध्यापक व अन्य जबाबदार मंडळींनी दखल घेऊन शाळेच्या आवारात पाणी राहणार नाही याबाबतची दखल घ्यावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या माता-पित्याने केली आहे.