वातावरण बदलामुळे कांदा मका पीक धोक्यात

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे

दिवसभर उष्ण तर रात्री थंड वातावरण असल्यामुळे कांदा, ज्वारी या पिकांवरती तांबेरा पडू लागलेला आहे तसेच टोमॅटो पिकावर देखील मोठ्या प्रमाणात करपा पडू लागलेला आहे त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढच होत आहे. सलग झालेल्या अति पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे त्यातच मका हे पीक लष्करी आळी मुळे नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे औषध फवारणी करून देखील मका पिकावरील लष्करी अळी जात नाही त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न बारामती तालुक्यातील पश्चिम भागात जाणवत आहे. साखर कारखाने चालू झाल्यामुळे थोडासा वाड्यामुळे पशुपालकांना दिलासा मिळाला असला तरी तीनशे ते चारशे रुपये शेकडा या दराने वाडे खरेदी करावी लागत आहे.