निवडणुकीत सहभाग वाढवा यासाठी निवडणूक आयोगाची सायकल रॅली

Uncategorized

प्रतिनिधी

मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुण्यात देशव्यापी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 ची सुरवात केलीशहरी भागातून मतदारांचा सहभाग वाढविण्यास वाव आहे: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारमुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय यांनी विविध जागरूकता कार्यक्रमांतून आज पुण्यात, देशव्यापी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 ची सुरवात केली. दिवसाची सुरवात मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांनी सायकल रॅलीत भाग घेऊन केली, याचा विषय होता, ‘सहभागी निवडणुकांसाठी सायकल चालवा’. ही रॅली बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंग इथून सकाळी सुरु झाली.

समाजाच्या विविध क्षेत्रातील मतदारांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला, यात तृतीयपंथी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, महिला, तरुण आणि इतरांचा समावेश होता. नागराज मंजुळे, ऑलिम्पिकपटू अंजली भागवत, मनोज पिंगळे, अजित लाक्रा आणि तृतीयपंथी कार्यकर्ता सान्वी जेठवानी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व्यक्ती या प्रसंगी उपस्थित होत्या. ‘एकही मतदार मागे राहता कामा नये’, सर्वसमावेशक आणि सुलभ निवडणुका तसेच मतदार नोंदणीचे महत्व आणि ‘या लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याचे महत्व’ असे संदेश पसरविण्यासाठी 200 पेक्षा जास्त लोकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

या सायकलस्वरांचा उत्साह वाढविण्यासाठी 20 किमी च्या या रॅली मार्गावर अनेक लोक जमा झाले होते. बाणेर मार्ग, पुणे विद्यापीठ चौक, राज भवन, ब्रेमेन चौक, परिहार चौक, मेडी पॉइंट हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल आणि गणराज चौक या शहराच्या लोकप्रिय भागातून ही सायकल रॅली काढण्यात आली आणि बालेवाडी क्रीडा संकुलात परत येऊन विसर्जित करण्यात आली.पुणे शहरात मतदारांमध्ये असलेली उदासिनता आणि तरुण मतदारांचा अल्प प्रतिसाद बघता, तरुण मतदारांना आणि एकूणच समाजाला निवडणूक प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने जनजागृतीसाठी ही सायकल रॅली काढली होती. देशभरात, अशा प्रकरच्या जनजागृती मोहिमा संबंधित मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजित केल्या आहेत.

ज्याद्वारे सर्वांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी जनजागृती केली जाईल आणि सर्वांना प्रोत्साहित केले जाईल.या प्रसंगी बोलताना, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “शहरी भागांतील सर्व मतदारांना, सर्व तरुणांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी आणि मतदान करावे. मतदान केल्यानेच लोकशाही परंपरा अधिक मजबूत बनतात.” शहरी भागातून मतदारांचा सहभाग वाढविण्यास वाव आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले. यासाठीच देशव्यापी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 पुण्यातून सुरु करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. जरी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण दरवर्षी केले जाते, तरी, या वर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी भर देणारे कार्यक्रम हाती घेतला आहे आणि त्याची सुरवात पुण्यातून केली आहे, असे ते म्हणाले. “काही शहरांत मतदान खूपच कमी होते आणि हे मतदान वाढविण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणूनच जनजागृतीसाठी आम्ही ही सायकल रॅली आयोजित केली आहे,” असे ते म्हणाले.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, “देशात सर्व भागात, अति दुर्गम राज्यांत, मग डोंगराळ भाग असो, किनारी भाग असो, दुर्गम डोंगर, वाळवंट, सगळ्या भागात, प्रत्येक नागरिकाची मतदार म्हणून नोंदणी होते. केवळ मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाह बळकट होत नाही तर त्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे.” भारतात 2.49 लाखांपेक्षा जास्त मतदार असे आहेत जे 100 + वयोगटातले आहेत. “जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला जातो तेव्हा हे ऐकून किती समाधान आणि आनंद मिळते की ते लोक आयुष्यभर मतदान करत आले आहेत,” ते म्हणाले. देशाचे पहिले मतदार, श्याम सरननेगी, जे 106 वर्षांचे होते आणि त्यांचे नुकतेच निधन झाले, यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, “त्यांनी मृत्युच्या तीन दिवस आधी टपालाद्वारे मतदान केले होते.

ही खरी भावना आहे.”सायकल रॅलीच्या मार्गात मुख्य निवडणूक आयुक्त काही ठिकाणी थांबले आणि त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले. कस्तुरबा वसाहतीच्या रहिवाश्यांनी निवडणूक आयोगाचे उत्साहात स्वागत केले आणि मुख्य निवडणूक आयुक्तांनी, महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना या भागातील पात्र मतदारांची नोंदणी करण्यात सहाय्य करण्याच्या सूचना केल्या. निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम नवीन सज्ञान नागरिकांची नोंदणी करण्यासाठी सूरु केला आहे. प्रत्येकाने मतदार म्हणून नोंदणी करून घावी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदार जागृतीचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, शहरी भागातील नागरिक निवडणूक प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी शहरी भागात सायकल रॅली सारखे विशेष उपक्रम राबविले जात आहेत.

राज्यातील प्रत्येक ग्रामसभेत 10 नोव्हेंबर रोजी मतदार याद्या वाचून दाखविल्या जातील. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर आयोजित करत आहेत, असे त्यांनी सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे डॉ राजेश देशमुख यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 अंतर्गत पुणे शहरात मतदार नोंदणीसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि विशेष शिबिरे आयोजित केली जातील असे सांगितले.