• Home
  • माझा जिल्हा
  • डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे मुंबई विमानतळावर 35 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त
Image

डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे मुंबई विमानतळावर 35 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन जप्त

प्रतिनिधी सोपान कुचेकर

नैरोबीहून मुंबईला आज 11 नोव्हेंबर 2022 रोजी येणारा एक प्रवासी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे त्या आधारावर डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पाळत ठेवली.संशयित प्रवाशाने ग्रीन चॅनेल पार केल्यानंतर त्याची ओळख पटल्यावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला अडवून त्याच्याकडील सामानाची कसून तपासणी केल्यानंतर त्यात भुकटीच्या स्वरुपात 4.98 किलो पांढरट पदार्थ सापडला.

चाचणी केल्यानंतर ते हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले.सामानाच्या ट्रॉली बॅगमध्ये शोधण्यास अत्यंत कठीण अशी एक छुपी पोकळी तयार करून त्यात काळ्या पॉलीथीनच्या पिशवीत भरलेले हेरॉईन फार कल्पकतेने लपविण्यात आले होते.जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 35 कोटी रुपये आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असून या तस्करीच्या पाठीमागे असणारे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे जाळे खणून काढून उध्वस्त करण्यासाठी अधिकाऱ्यांचा तपास सुरु आहे.

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026