संपादक मधुकर बनसोडे.
निंबूत येथे जिल्हा परिषद शाळा वॉल कंपाऊंड दहा लाख, कुस्ती आखाडा येथे व्यायाम शाळा दहा लाख, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती सात लाख रुपयाचा निधी. राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून. मा. बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्री प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला होता या सर्व विकास कामांचे भूमिपूजन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. अध्यक्ष श्री शहाजीराव काकडे, युवा नेते श्री गौतम काकडे, ग्रामपंचायत सरपंच निर्मलाताई काळे, निंबुत ग्रामपंचायत उपसरपंच अमर काकडे, नंदकुमार काकडे, कुमाताई काकडे, शिरीष काकडे, पै.राजेंद्र काकडे, लालासाहेब काकडे, विजयराव काकडे, रामभाऊ काकडे, सुमित काकडे, ग्रामविकास अधिकारी काळभोर, यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले यावेळी नींबूत येथील असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सोमेश्वर चे मा. अध्यक्ष यांनी बोलताना सांगितले विद्येच्या मंदिराचे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला मिळते तो खऱ्या अर्थाने भाग्यवान समजला जातो या विद्येच्या मंदिराच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हाईगाई ग्रामस्थ सहन करणार नाही दर्जेदार व उत्तम प्रकारचे काम आपण करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. निंबुतच्या विकासाचा गाडा सदैव याच जोमाने चालू राहील त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू अशी भावना सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केली.
प्राथमिक शाळेमध्ये सर्वसामान्यांची मुलं आज शिकत आहेत निंबूतची प्राथमिक शाळा ही भविष्यात आदर्श शाळा म्हणून पाहिली जाईल यासाठी सर्व प्रयत्न करून शाळा नवा रुपाला आणू असे प्रतिपादन श्री गौतम काकडे यांनी व्यक्त केले.