• Home
  • माझा जिल्हा
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव:विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण
Image

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृत महोत्सव:विशेष बोधचिन्हाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते अनावरण

प्रतिनिधी

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सदस्य, कुलसचिव उपस्थित होते.

बोधचिन्हासाठी विद्यापीठातर्फे स्पर्धा घेण्यात आली होती. २०० प्रवेशिकांमधून अनुगार साळुंके यांनी तयार केलेल्या बोधचिन्हासाठी निवड करण्यात आली. त्याला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते श्री. साळुंके यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

१० फेब्रुवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२५ याकालावधीत वर्षभर विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, डॉ.नितीन घोरपडे, धोंडीराम पवार, संदीप पालवे, सिनेट सदस्य सर्वश्री सचिन गोर्डे, अशोक सावंत, विजय सोनवणे आदी उपस्थित होते.

Releated Posts

कामाच्या तासानंतर ‘डिस्कनेक्ट’ राहण्याचा हक्क: ‘राईट टू डिस्कनेक्ट’ विधेयक संसदेत सादर 

प्रतिनिधी ​कर्मचाऱ्यांच्या ताणमुक्तीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल; खासगी सदस्याचे विधेयक सादर.  आधुनिक कार्यशैलीमध्ये कर्मचाऱ्यांवरील वाढता मानसिक ताण आणि कामाच्या तासांनंतरही…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

प्रवेशापूर्वी गर्भधारणा चाचणीची सक्ती; चौफेर टीका झाल्यावर नियम तत्काळ रद्द;

प्रतिनिधी   ​पुणे जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ‘प्रेग्नन्सी टेस्ट’ (गर्भधारणा चाचणी) अनिवार्य करण्यात आल्याची धक्कादायक…

ByBymnewsmarathi Dec 9, 2025

सोमेश्वरने केली एफ.आर.पी. वरील व्याजाची रक्कम जमा

प्रतिनिधी शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025

तुऱ्यामुळे उसाच्या उत्पादनाची चिंता आणि कारखान्यापुढील आव्हान

संपादक- मधुकर बनसोडे ​सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात सध्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025