बारामती ! बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य व वडगाव निंबाळकर ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर मध्ये अपघाताचे प्रमाण जास्त होत असल्याने बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य व वडगाव निंबाळकर ग्रामस्थ यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग यांना डबल चे स्पीड ब्रेकर बांधण्यासाठी निवेदन देण्यात आले होते . यामध्ये बहुजन हक्क परिषद युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नानासाहेब मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पांडुरंग घळगे , बारामती तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी आपले निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग ला निवेदन देऊन अमोल गायकवाड यांनी पोलिस स्टेशनचे देखील या ठिकाणी स्पीड ब्रेकर ची गरज असल्याचे पोलिस स्टेशनने पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग ला देण्यात आले होते .

हे स्पीड ब्रेकर टाकल्याने वडगाव निंबाळकर येथील होणाऱ्या अपघातांना कुठे तरी कमी पणा येईल असे ग्रामस्थांकडून बोलताना संबोधले जात आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग ने बहुजन हक्क परिषदेचे अमोल गायकवाड व वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पत्राचा पाठपुरावा करून दि . २७ ऑक्टोंबर रोजी वडगाव निंबाळकर येथे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले . यावेळी वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून बहुजन हक्क परीषद चे कार्यकर्ते नानासाहेब मदने, अमोल गायकवाड ,पांडुरंग घळगे यांना पेढे भरउन अभिनंदन व आभार मानले . यावेळी अमित शिंदे, नदीम खान , सचिन खोमणे , सौरभ निंबाळकर , नेवसे , ठोंबरे , यादव, राऊत हे उपस्थित होते .