प्रतिनिधी – फिरोज भालदार
चोपडज ग्रामपंचायत येथील वॉर्ड नं. २ मधील सदस्या विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर यांना सन २००५ नंतर ३ हयात अपत्य असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्या म्हणून काम करण्यास अपात्र ठरवण्यात आले . ग्रामपंचायत चोपडज मधील सदस्य सुधीर दिलीप गाडेकर , जयश्री संदीप गाडेकर व स्वाती राजेंद्र यादव यांनी जिल्हाधिकारी सो पुणे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता . या अर्जाचे काम विद्या कोळेकर यांनी त्यांना असणाऱ्या तीन अपत्यांपैकी दोन मुली या जुळ्या असल्यामुळे म्हणणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केले होते व त्यासाठी ग्रामपंचायत चोपडज मधील खोटे व बनावट जन्माचे दाखले तसेच मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा कानाडवाडी यांच्याकडील खोटे बोनाफाईड सर्टिफिकेट सादर केले होते .
मात्र तपासी अधिकारी माकर यांनी सखोल चौकशी करून कागदपत्रे पुरावे जमा करत कोळेकर या त्यांना असणाऱ्या मुली या त्यांचे पतीचे नाव बदलून मारुती व हनुमंत अशा नोंदी करून लपवत असल्याची बाब तसेच त्यांच्या तिन्ही मुलांचे जन्मतारखा या वेगवेगळ्या असून त्यांना सन २००५ नंतर ३ जिवंत अपत्य असल्याबाबत चौकशी अहवाल गटविकास अधिकारी बारामती यांच्यामार्फत सादर करण्यात आला होता. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनीही चौकशी करून अहवाल सादर केला होता. हजारे यांनी दाखल केलेला अर्ज व पुरावे तसेच या कामी सादर अहवाल यांचा विचार करून जिल्हाधिकारी पुणे यांनी विद्या मारुती उर्फ हनुमंत कोळेकर यांना कायद्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य करण्यास अपात्र असल्याबाबतचा आदेश दि. २. ११. २०२३ रोजी जाहीर केला आहे . याप्रकरणी तक्रारदार यांच्या वतीने अँड. इम्रान चाँद खान यांनी काम पाहिले.
विद्या मारुती ऊर्फ हनुमंत कोळेकर यांचे पती यांनी पत्नीस मदत करता यावी म्हणून बारामती न्यायालयामध्ये कोर्टाची फसवणूक करून त्यांच्या दोन मुली जुळ्या असल्याबाबत खोटा अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर करून कोर्टाची फसवणूक केलेली आहे . त्याबाबत बारामती न्यायालयामध्ये स्वतंत्र केस चालू असून या कामी लवकरच विद्या कोळेकर यांचे पती मारुती ऊर्फ हनुमंत कोळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती तक्रारदार व ॲड . इम्रान खान यांनी दिली .
यावेळी अझर तांबोळी , गोरख यादव यांनी निकालाबद्दल आनंद व्यक्त करून “ये तो बस झाँकी है, पिक्चर अभी बाकी है” असे म्हणत आनंद व्यक्त केला. तर
उमेश निवृत्ती गायकवाड ,बाबासाहेब धुमाळ, सागर गायकवाड ,निंबाळकर साहेब, संदीप गाडेकर, यांनी ‘भगवान के घर देर है अंधेर नही’ अशी भावना व्यक्त केली .