श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू. प्रती मेटन जाहिर करून तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी…:- श्री सतिशयव काकडे

माझा जिल्हा

प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२३-२४ सुरू होवुन २० दिवसांमध्ये जवळपास १ लाख ३८हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. तरी देखील सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहिर केलेली नाही ही खेदाची बाब आहे. वास्तविक उस गाळप झाल्या नंतर १४ दिवसांच्या आत FRP रक्कम देणे बंधनकारक असतानाही चेअरमन व संचालक मंडळ सभासदांना जाणीव पुर्वक वेठीस धरत आहेत. तरी कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाने सन २०२३-२४ या गाळप हंगामाची पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू. प्रती मे.टन तात्काळ जाहिर करून सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी. अन्यथा नाईलाजास्तव कारखान्याचा काटा बंद आंदोलन करावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची राहिल याची गंभीर नोंद प्रशासनाने घ्यावी.

गतवर्षीचा सन २०२२-२३ चा अंतिम उस दर ३६३९/- रू. प्रती मे.टन बसत असताना देखील सभासदांनी ३३५०/- रू. प्रती मे.टन अंतिम दर इच्छा नसताना घेतलेला आहे याची जाणीव चेअमरन व संचालक मंडळाने ठेवावी. चेअमरन यांच्या म्हणण्यानुसार कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे तरी आजपर्यंत १ लाख ३८ हजार मे.टन गाळप होवुन देखील पहिली उचल का जाहिर करता आली नाही. याचे उत्तर पहिल्यांदा सभासदांना द्यावे.

आज को-जन प्रकल्पाची क्षमता वाढली असुन ३६ मे.वॅट प्रकल्प कार्यान्वीत होवुन अधिकचे जादा उत्पन्न मिळणार आहे. साखर विकीचा सरासरी दर ३५०० रू. क्विंटलच्या वर आहे, उपपदार्थांचे दर देखील (आल्कोहल) वाढलेले आहेत. तसेच ऑक्टोंबर अखेर एप्रिल नंतरची शिल्लक साखर सुमारे ८.५० लाख पोती विकी होवुन त्यास ३४८०/- रू. प्रती क्विंटल दर मिळाल्याने कारखान्याकडे सुमारे २४ ते २५ कोटी रूपये वाढावा (कॅश फ्लो) आलेला आहे. उपपदार्थाच्या विकीतुन सुमारे ७ ते ८ कोटी रूपये आलेले आहेत. तसेच वीज विकीचे राहिलेले १४ कोटी रूपये देखील मिळालेले आहेत. तसेच तरतुद करून ठेवलेले १५ कोटी रूपये ठेव विमोचन निधी खेळत्या भांडवलामध्ये पडुन आहे. असे सुमारे एकुण ६२ कोटी रूपये पहिल्या उचलीसाठी कारखान्याला उपलब्ध होत आहेत. तसेच चालु हंगामाचे ३६ मे.वॅट को-जन मधुन मिळणारे व डिस्टीलरी उपपदार्थांमधुन मिळणारे उत्पन्न सोडुन प्रती मे.टन ४०० ते ५०० रू. कारखाना पहिल्या उचली करीता वापरू शकतो.

 

१०.२५ टक्के रिकव्हरीला ३१५०/- रू. (व वरील १ टक्के रिकव्हरीला ३०५ रू.)

१.६५ ५२०/- ( रिकव्हरी ११.९०)

 

३६७०/-

 

तोडणी वाहतुक ७२०/- (करार/वाढीव करार महागाई मुळे वाढधरून)

 

२९५०/- FRP

 

जादा उचल ३५०/- (कारखान्याकडे असलेल्या ६२ कोटी रू. उत्पनातुन) सन २३-२४ या हंगामाची पहिली उचल ३३००/- बसु शकते.

तरी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ या गाळप हंगमाची पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू. प्रती मे.टन पेक्षा कमी दिल्यास त्याचा परिणाम सभासद व गेटकेन शेतकरी यांचेवर होवु शकतो कारण चेअरमन यांनी २०२२/२३ च्या वार्षिक अहवालात चालु हंगामाचा उस दर २९००/- प्र. मेटन नमुद केला आहे. तरी याचा विचार करून सन २०२३/२४ पहिली उचल ३३००/- रू प्र. जाहिर करून सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करावी. अन्यथा शेतकरी कृती समितीस काटा बंद आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.

 

दि.७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपुर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उस परिषद झाली त्यामध्ये ३५००/- रू. प्रती मे.टन पहिली उचल देण्याचा ठराव मंजुर झाला. परंतु आपल्या कारखान्याची रिकव्हरी व आर्थिक परिस्थिती पाहता एकरक्कमी ३३००/- रू. पहिली उचल देण्यात यावी. वारणा सहकारी साखर कारखान्याने एकरक्कमी पहिली उचल ३२००/- रू. प्रती मे.टन जाहिर केलेली आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने कारखान्याला गेटकेन उसाची आवश्यकता असल्याने ३३००/- रू. प्रती मे.टन पहिली उचल जाहिर केल्यास उसाची उपलब्धता होईल. तरी सोमेश्वर कारखान्याने सन २०२३-२४ या गाळप हंगामाची पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू. प्रती मे.टन जाहिर करून राज्यात डंका करावा.