बारामती ! वडगाव निंबाळकर जि.प. प्राथमीक शाळा नं.२ मध्ये केंद्राच्या कला-क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नं.२ शाळेत यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत वडगाव निंबाळकर केंद्राच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यामध्ये वडगाव निंबाळकर केंद्रातील जिल्हा परिषदेच्या १५ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये केंद्र समन्वयक सोमनाथ चौगुले,केंद्रप्रमुख हनुमंत चव्हाण,विस्ताराधिकारी नवनाथ कुचेकर यांनी मार्गदर्शन केले आणि गटशिक्षणाधिकारी संपतराव गावडे यांनी यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले . शाळेच्या मुख्याध्यापिका कविता जाधव यांनी सर्व स्पर्धक व प्रशिक्षकांचे स्वागत केले , या स्पर्धेमध्ये प्रश्नमंजुषा वक्तृत्व लांब उडी ,उंच उडी,भजन स्पर्धा, धावणे, थाळीफेक ,गोळा फेक, खो खो ,कबड्डी या विविध स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त झाले .

• लहान गट (इ.१ ते ५)-प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रथम क्रमांक आर्यन सागर गवळी-रुद्र अनिल खोमणे,
•50 मीटर धावणे प्रथम क्रमांक आर्यन सागर गवळी आणि शर्वरी हनुमंत खोमणे,
•धावती उंचउडी प्रथम क्रमांक संभव प्रकाश कोकरे आणि शर्वरी हनुमंत खोमणे,
•लांबउडी प्रथम क्रमांक शर्वरी हनुमंत खोमणे आणि आयुष सचिन आवाडे,
•वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक वैष्णवी पांडुरंग हिरवे,
•लोकनृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक शाळा किंगरे परांडे मळा,
•भजन स्पर्धा प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर २,
•मोठा गट (इ.६ ते ८)कबड्डी-खो खो प्रथम क्रमांक-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकाळे
•मोठा गट प्रथम क्रमांक- कबड्डी,खोखो-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकाळे,
•थालीफेक-सिद्धी गजानन जगताप आणि आर्यन दत्तात्रय सोनवणे,
•गोळाफेक-सिद्धी गजानन जगताप आणि आर्यन दत्तात्रय सोनवणे,
•वक्तृत्व स्पर्धा- अस्मिता अमित जगताप,
लांबउडी सुजित शिवाजी पवार आणि सिद्धी गजानन जगताप.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अनिल गवळी सर यांनी केले .