संपादक मधुकर बनसोडे.
जेजुरी पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी सह शहरातील इतर अवैद्य दारू विक्री वरती कारवाई केल्याच्या बातम्या वारंवार पाहावयास मिळत आहेत खरंतर ही आनंदाची गोष्ट आहे.
मात्र नीरा नजीक निरा मोरगाव रोड वरती एका हॉटेलमध्ये अनाधिकृत रित्या राजरोसपणे मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
हे हॉटेल जरी पुरंदर तालुक्यात असले तरी हॉटेल चालक हा बाहेरच्या तालुक्यातून येऊन नीरा मोरगाव रोड वरती असणाऱ्या एका हॉटेलमध्ये दारू विक्रीचा कोणताही परवाना नसताना त्या ठिकाणी दारू विकत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
दारू विक्रीचा परवाना नसताना या हॉटेलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू विक्रीसाठी येथे कोठून खरंतर हा खूप मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
राजरोसपणे अवैध दारू विक्री करणाऱ्या या हॉटेल चालकाला नक्की कोणाचा आशीर्वाद लाभलेला आहे?
कधी होणार या अवैधरीत्या दारू चालकावरती कारवाई.
अवैद्य दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून कोणास काही आर्थिक देवाणघेवाण केली जात आहे का? त्यामुळेच कदाचित हा दारू विक्रेता राजरोसपणे दारू विक्री करत असावा असे देखील स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे.
गुळूंचे नजीक देखील एका पोल्ट्रीमध्ये हा धंदा राजरोसपणे सुरू आहे.?
पुरंदर तालुक्यातील एक्साईज डिपार्टमेंट, पोलीस प्रशासन, कधी करणार या अवैद्य दारू विक्रेत्यांवरती कारवाई.
जेजुरी पोलीस स्टेशनचे दबंग पोलीस निरीक्षक यांनी इतर ठिकाणी ज्याप्रमाणे दारू विक्रेत्यांवरती कारवाया केलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील कारवाई करावी व अवैद्य दारू विक्री कायमस्वरूपी हद्दपार करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
ही दारू विक्री केली जाते ती डुबलीकेट दारू तर नाही ना? कोणी स्थानिकांच्या जीवाशी खेळत तर नाही ना? याची देखील शहानिशा होणे खूप गरजेचे आहे