प्रतिनिधी
जेजुरी गडावर परिसरामध्ये प्लाईंग रायनो (पॅरामोटर) भाविकांची खुप मोठ्या प्रमाणावर लुट करत असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रश्नी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी आवाज उठविला आहे.
ही लूट थांबावी म्हणून तहसिल कार्यालय आणि जेजुरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेले आहे.निवेदनात काही मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत.
अमोल साबळे यांनी असे म्हटलेले आहे की, जिजामाता हायस्कुल/एस.पी. कॉलेज विदयार्थीनी / विदयार्थी यांना कर्कश आवाजाने ध्वनीप्रदुषणाचा सामना करावा लागतोय.तसेच जवळुनच महावितरणाची लाईन गेली आहे. केव्हाही दुर्घटना घडू शकते.प्लाईंग रायनो (पॅरामोटर) याचा कोणताही परवाना नाही.प्लाईग रायनो (पॅरामोटर) करणा-यांना रू ३०००/- (५ मिनिटांसाठी), तसेच कॅमेराशुटींगसाठी रू. १०००/- आकारले जातात. याचे कोणत्याही प्रकारचे जी.एस.टी. बिलींग दिले जात नाही.प्लाइंग रायनो (पॅरामोटर) याचा कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स काढला जात नाही.त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे.तसेच कोणत्याही प्रकारचे सुरक्षा व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले आहे.
जेजुरी गडाच्या पावित्र्यास,पुरात्वास इजा होण्याची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असल्या कारणाने प्लाईंग रायनो (पॅरामोटर) त्वरित बंद करावे अशी विनंती अमोल साबळे यांनी केलेली आहे.त्यामुळे या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी केलेली असून या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)या पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा अमोल साबळे यांनी दिलेला आहे.