• Home
  • क्राईम
  • समाजमाध्यमात झालेली ओळख पडली महागात, परिचारिकेला न्यूड क्लिप प्रसारित करण्याची धमकी, खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा
Image

समाजमाध्यमात झालेली ओळख पडली महागात, परिचारिकेला न्यूड क्लिप प्रसारित करण्याची धमकी, खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

प्रतिनिधी

समाजमाध्यमात झालेली ओळख एका परिचारिकेला महागात पडली. तिची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन परिचारिकेला खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. त्या पतीपासून विभक्त झाल्या आहेत. सायबर चोरट्याने परिचारिकेला समाजमाध्यमातून मैत्रीची विनंती पाठविली होती.

चोरट्याने त्याचे नाव अमनप्रीत सिंग असे सांगितले होते. लंडमधील एका कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी त्याने केली होती. लंडनमधून लवकरच भारतात परतणार असून, सायबर चोरट्याने परिचारिकेला विवाहाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. परदेशातून महागडी भेट पाठविणार असल्याचे त्याने सांगितले. परदेशातून पाठविलेले भेटवस्तुंचे खोके घेण्यासाठी २७ हजार रुपये लागतील, असे त्याने सांगितले. परिचारिकेकडून त्याने पैसे उकळले.

सिंगने तिची ध्वनिचित्रफीत तयार केली. ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने परिचारिकेकडे खंडणी मागितली. घाबरलेल्या परिचारिकेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026