प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत , श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे, सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय सोमेश्वर नगर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे, देऊलवाडी करंजे ता. बारामती येथे गुरुवार दि.१८ जानेवारी २०२४ रोजी उद्घाटन सभारंभ झाला .
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सौ प्रणिता ताई खोमणे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले , यावेळेस त्यांनी श्रमसंस्कार शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन केले व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संचालक मा.श्री जितेंद्र निगडे व करंजे गावचे सरपंच भाऊसो हुंबरे यांनी शिबिरार्थीना शुभेच्छा देण्याबरोबरच सर्वोतपुरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळेस दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.बी. सुर्यवंशी यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व यावेळेस सांगितले व विद्यार्थ्यांनी सर्वच उपक्रमामध्ये पूर्ण क्षमतेने सहभागी व्हावे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश निकाळजे यांनी केले सूत्रसंचालन प्रा.मयुरी यादव तसेच आभार उपप्राचार्य धनंजय बनसोडे यांनी मानले.
यावेळेस करंजे गावचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू दगडे, अशोक होळकर ,रूपाली शिंदे, खुर्शीदा मुलाणी, मयुरी गायकवाड, अफसाना मुलाणी तसेच देवस्थान ट्रस्ट प्रतिनिधी बाळासाहेब भांडवलकर , प्रा.प्रीती निगडे, प्रा.अजित जगताप,श्री संदीप जगदाळे , इतर ग्रामस्थ व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होईल यावर भर देण्यात आला. स्वयंसेवकांनी श्रमदानातून श्री सोमेश्वर देवस्थान येथील परिसर व देऊळवाडी येथील लोकवस्ती मध्ये स्वच्छता केली, जि. प. शाळा करंजे येथील परिसर स्वच्छता , सांडपाणी व्यवस्था व झाडांना आळी केली. करंजे गावातील सर्व सार्वजनिक जागा , ग्रामपंचायत परिसर, दुतर्फा रस्ते , वृक्ष लागवड केली.
महाविद्यालय व शिरीष लॅबोरेटरी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला भगिनींसाठी मोफत रक्तप्रमाण तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते यामध्ये ७८ महिला सहभागी झाल्या.
गावातील ग्रामस्थांसाठी सुप्रसिद्ध श्री विठ्ठल भजनी व भारुड मंडळ , सोनगाव ता. फलटण यांचे भारुड आयोजित केले होते त्याला गावकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली होती त्यामध्ये एन. एस.एस.- व्यक्तिमत्त्व विकासाची कार्यशाळा, युवकांचा ध्यास – ग्रामविकास, प्रवास आणि व्यक्तिमत्व विकास, गिर्यारोहण- एक विलक्षण अनुभव, सुपे – बारामती ते केदारनाथ नेपाळ सायकलवरती ६००० किमी प्रवास अनुभव, प्रशासकीय कामकाजाची माहिती, पथनाट्य कार्यशाळा, या विषयांवर अनुक्रमे प्रा. विलास कर्डीले, प्रा .अच्युत शिंदे, श्री सचिन वाघ, श्री मानसिंह चव्हाण , श्री विलास वाघचौरे, श्री आनंदराव जगताप, श्री सोमनाथ कदम यांनी व्याख्याने दिली.
काव्यसंमेलन प्रसंगी श्री शुभम काकडे व स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रसिद्ध गायक श्री अनिकेत हुंबरे उपस्थित होते.
शिबीर स्वयंसेवकांना परिसरातील वनस्पतींची माहिती व पक्षी निरीक्षण हे उपक्रम अनुक्रमे प्रा शुभम ठोंबरे व प्रा राजेश निकाळजे यांनी राबविले.
कार्यक्रमाचे समारोप बुधवार दि २४ जानेवारी रोजी संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आनंदकुमार होळकर मा.व्हा.चेअरमन श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना लि. , श्री प्रवीण कांबळे संचालक, श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना , श्री विष्णु दगडे ग्रामपंचायत सदस्य करंजे , प्राचार्य संपतराव सूर्यवंशी, प्रा पचुकांत होळकर, प्रा शुभांगी कांबळे, प्रा. प्रियांका निगडे व इतर उपस्थित होते .
या शिबिरास श्री.सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री पुरुषोत्तमदादा जगताप , सचिव श्री भारत खोमणे, संचालक प्रतिनिधी मा.श्री आनंदकुमार होळकर व सर्व संचालक मंडळ यांनी शिबीर यशस्वी केल्याबद्दल अभिनंदन केले
कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश निकाळजे यांनी शिबिराचे यशस्वी नियोजन केले.