• Home
  • क्राईम
  • आमदार रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा भररस्त्यात पिस्तूल काढून राडा
Image

आमदार रोहित पवारांच्या माजी अंगरक्षकाचा भररस्त्यात पिस्तूल काढून राडा

प्रतिनिधी

कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या माजी अंगरक्षकाने किरकोळ कारणावरून पिस्तूल काढून राडा घातल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. सुरक्षारक्षकाकडे शस्त्र परवाना असून, त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि सात काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी प्रताप धर्मा टक्के (वय ३९, रा.कात्रज) याच्याविरुद्ध बुधवारी रात्री उशीरा हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सौरभ तानाजी काळे (वय २७, रा. हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी प्रताप टक्के बुधवारी (७ फेब्रुवारी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हडपसर भागातील माळवाडी येथून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणांबरोबर त्याचा वाद झाला. प्रतापने त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तूल तरुणांवर रोखले. शिवीगाळ करून त्याने दहशत माजविली. त्यानंतर घाबरलेल्या सौरभ आणि मित्रांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. प्रताप याच्याविरुद्ध रात्री उशिरा हडपसर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी देणे, तसेच शस्त्राचा धाक दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. आरोपी प्रताप गेल्या वर्षी आमदार रोहित पवार यांच्याकडे खासगी अंगरक्षक म्हणून काम करत होता. सध्या तो त्यांच्याकडे अंगरक्षक म्हणून काम करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026