• Home
  • क्राईम
  • हिंजवडीत बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी अटकेत
Image

हिंजवडीत बनावट पासपोर्ट बनवणारी टोळी अटकेत

प्रतिनिधी

ब्रुनेई देशात जाण्यासाठी बनावट पारपत्र बनवणाऱ्या तिघांसह शिक्का बनवून देणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींनी १२५ लोकांकडून पारपत्र घेऊन ४८ बनावट पारपत्र बनविले असून त्यासाठी पैसे घेतल्याचे उघडकीस आले आहे.

विजय प्रताप सिंग (वय ४४), किसन देव पांडे (वय ३५, दोघे रा. मामुर्डी, मूळ – उत्तर प्रदेश), हेमंत सीताराम पाटील (वय ३८, रा. किवळे, मूळ – गवळेनगर, धुळे), किरण अर्जुन राऊत (वय ३४, रा. शाहूनगर, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मनीष कन्हैयालाल स्वामी (वय ३२, रा. राजस्थान) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी विजय, किसन आणि हेमंत हे पूर्वी आयात-निर्यात व्यवसायात काम करत होते. त्यांनी लोकांच्या फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली. भारतातून परदेशात जाणारे वेल्डर, वाहनचालक, प्लंबर यांना पारपत्र देण्यासाठी ‘ब्ल्यू ओसियन मरीन’ या नावाने कंपनी सुरू केली. लोकांकडून पारपत्र काढण्यासाठी पैसे घ्यायचे आणि पैसे घेऊन पळून जायचे. पारपत्र काढून देण्यासाठी लोकांकडून खरे पारपत्र घेतले जात होते.

विश्वास संपादन करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नागरिकांना सांगितले जात असे. त्यानुसार, नागरिकांकडून कागदपत्रे आल्यानंतर पारपत्रावर ब्रुनेई देशाचा बनावट शिक्का मारून त्यांना खरे पारपत्र असल्याचे भासवून दिले जात असे. काहीजण ब्रुनेई देशात जाण्यासाठी पारपत्र घेऊन विमानतळावर गेले असता तिथे हे शिक्के बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही लोकांनी दिल्ली येथील ब्रुनेई देशाच्या दुतावासात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी त्यांच्या पारपत्रावर बनावट शिक्के मारल्याची खात्री झाली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026