• Home
  • क्राईम
  • दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले;
Image

दलित मुलीवर प्रेम केल्याने वडिलांनी मुलाला संपवले;

प्रतिनिधी

दलित समाजाच्या मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरून संतप्त वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यात पोलीस तपासात उघडकीस आला. दुसऱ्या मुलाच्या मदतीने वडिलांनी मुलाचा गळा आवळून जीव घेतला. घटनेनंतर संपूर्ण कुटुंब बाहेरगावी प्रसार होऊन मुलाला कोणी तरी मारल्याचा बनाव रचला होता. पोलीस तपासात मात्र सत्य समोर आले. संदीप नागोराव गावंडे (२६) असे मृताचे, तर नागोराव कर्णाजी गावंडे असे आरोपी वडिलांचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात नागोराव गावंडे त्यांच्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. संदीपचे गावातील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील मुलीशी प्रेम होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे प्रेम संबंध वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरात वाद देखील निर्माण होत होता. दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना कळली. त्यावरून वडील नागोराव व संदीपमध्ये वाद झाला. या दरम्यान वडिलांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या मदतीने घरातच संदीपचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर संदीपचे हातपाय बांधून घराला कुलूप लावून सर्व बाहेरगावी निघून गेले. शुक्रवारी सायंकाळी घरी परतले आणिआपल्या मुलाला कोणीतरी मारले, असा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात सर्व प्रकार उघडकीसझाला. या प्रकरणी वडील आणि मृतकाचा भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पिंजर पोलीस करीत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026