• Home
  • क्राईम
  • शाळेच्या छतावर मृत अर्भक, मांसाचे तुकडे आढळले
Image

शाळेच्या छतावर मृत अर्भक, मांसाचे तुकडे आढळले

प्रतिनिधी

 रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच्या छतावर एक नवजात मृत अर्भक व मांसाचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली. रविवारी दुपारी मुले क्रिकेट खेळत असतांना हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील रतनलाल प्लॉट स्थित जिल्हा परिषदेची बंद पडलेली उर्दू माध्यमिक शाळेची इमारत आहे. या शाळेच्या परिसरात काही मुले क्रिकेट खेळत होती. चेंडू इमारतीच्या छतावर गेल्याने तो काढण्यासाठी मुले देखील गेली. इमारतीवर नवजात अर्भक मृतावस्थेत दिसून आल्याने मुले घाबरली. त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चार ते पाच महिन्याचे हे अर्भक असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मांसाचे तुकडे देखील दिसून आले. पोलिसांनी पंचनामा करत अर्भक ताब्यात घेतले. ते तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026