• Home
  • क्राईम
  • वहिनीचा खून करून सराइत गुन्हेगाराची मटण पार्टी; ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Image

वहिनीचा खून करून सराइत गुन्हेगाराची मटण पार्टी; ‘असा’ सापडला पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून सराइताने वहिनीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावातील डोंगराजवळ पुरला. मृतदेहाची विल्हेवाट लावून आरोपीने घरी येऊन मटण पार्टी केली. अखेर या गुन्ह्याला वाचा फुटली असून, याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका सराइताला अटक केली.

गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१, रा. परंदवाडी, शिरगाव, ता. वडगाव मावळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरातील एका गुन्ह्यात चव्हाण पसार झाला होता. त्याने शिरगाव परंदवाडी येथे त्याची भावजय सुनंदा चव्हाण हिचा भाऊ लक्ष्मण चव्हाण याच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून केला होता. त्यानंतर तिचा मृतदेह पाचर्णे गावाजवळ असलेल्या डोंगरात नेला. तेथे खड्डा खोदून मृतदेह पुरला. थंड डोक्याने खून केल्यानंतर गणेश आणि त्याचा भाऊ लक्ष्मण घरी आले. त्यांनी घरी मटण तयार करून पार्टी केली. भावजयीचा खून केल्यानंतर पसार असलेला आरोपी गणेश नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस नाईक अजित फरांदे यांना मिळाली.

लोणीकंद परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ सापळा लावून त्याला पकडले. चौकशीत त्याने भावजयीचा खून केल्याची कबुली दिली. त्याला तपासासाठी परंदवाडी पोलीस चौकीतील उपनिरीक्षक तपासधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या ताब्यात देण्यात आले. गणेशविरुद्द चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (माेक्का) कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो पसार झाला होता. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, किरण पड्याळ, अजित फरांदे, प्रतिक्षा पानसरे यांनी ही कारवाई केली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026