• Home
  • क्राईम
  • प्रियकर-प्रेयसी लग्न करण्यासाठी बनले एटीएम चोर
Image

प्रियकर-प्रेयसी लग्न करण्यासाठी बनले एटीएम चोर

प्रतिनिधी

बेरोजगार असलेल्या प्रियकर आणि प्रेयसीने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह करण्याचे ठरविले. मात्र, लग्न करून संसार सुरु करण्यासाठी पैसा नव्हता. त्यामुळे लग्नापूर्वी त्यांनी पैसा जमा करण्यासाठी त्यांनी थेट एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमविण्याचा गोरखधंदा सुरु केला. मात्र, गणेशपेठ, लकडगंज व तहसिल आणि अजनीतील एटीएममधील पैसे काढल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आदिल राजू खान (२०, रा. दत्तवाली, जि. फत्तेपुर, उत्तरप्रदेश) आणि प्रियंका सतविर सिंग (२१, रा. मुरादीपूर, जि. कानपूर, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरला लोखंडी पट्टी लाऊन त्यास ट्रेस करून नुकसान करीत २ हजार रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे चॅनल मॅनेजर स्वप्निल मारोतराव गभणे (३५, रा. नेहरुनगर सक्करदरा) यांनी सीसीटीव्ही पाहून अजनी ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक पंकज बावणे यांनी गुन्हा दाखल करून परिसरात शोध घेतला असता दोन्ही आरोपी आढळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशात राहतात. दोघेही बेरोजगार असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी चोरी करण्याचा बेत आखला. त्यासाठी ते रेल्वेने नागपुरात येऊन रेल्वेस्थानकावर मुक्काम करायचे. पहाटे किंवा रात्री ते एखाद्या एटीएम मशीनचा शोध घेऊन त्यात धागा व पट्टी टाकून ठेवायचे. एखादा ग्राहक पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर धागा व पट्टी टाकल्यामुळे त्याच्या खात्यातून पैसे वजा व्हायचे. परंतु एटीएममधून पैसे बाहेर येत नव्हते. त्यामुळे तांत्रीक बिघाड असावा, असा विचार करून ग्राहक परत जात होते. ग्राहक केल्यानंतर आरोपी आपली शक्कल लढवून पैसे काढून घ्यायचे. अशा प्रकारे त्यांनी गणेशपेठ, तहसिल, लकडगंज ठाण्याच्या परिसरात चोरी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान अजनी पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर करून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळविली आहे. पुढील तपास अजनी पोलिस करीत आहेत.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026