• Home
  • क्राईम
  • अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी एक डॉक्टर अटकेत; एकूण सातजण जेरबंद
Image

अवैध गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी एक डॉक्टर अटकेत; एकूण सातजण जेरबंद

प्रतिनिधी

कोल्हापूर येथे उघडकीस आलेल्या अवैध गर्भलिंग निदानप्रकरणी पोलिसांनी आणखी एका डॉक्टरला बुधवारी अटक केली. डॉ. युवराज निकम ( रा. गगनबावडा ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी आजपर्यंत सात जणांना जेरबंद करण्यात आले आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्कमधील एका घरात अवैध गर्भलिंग निदान केंद्र सुरु असल्याची माहिती मिळाल्याने आरोग्य विभाग आणि पोलिसांनी १६ जानेवारी रोजी छापा टाकला होता. या प्रकरणी बोगस डॉ. स्वप्नील केरबा पाटील, टेक्निशियन अमित केरबा डोंगरे,एजंट कृष्णात आनंदा जासूद, प्रदीप बाजीराव कोळी, पंकज नारायण बारटक्के, निखिल रघुनाथ पाटील या सहा जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे.

यातील मुख्य सूत्रधार बोगस डॉ. स्वप्नील केरबा पाटील याचा यापूर्वी मुरगुड आणि राधानगरी येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात करवीर पोलीसांनी आज मुळचा म्हालसवडे ( ता. करवीर ) येथील आणि सध्या वैभववाडी येथे रुग्णालय चालवणारा डॉ. युवराज विलास निकम याला अटक केली आहे. त्याने वैभववाडीसह कोकण परिसरातील महिला गर्भलिंग निदानासाठी पाठवल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026