• Home
  • क्राईम
  • गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!
Image

गुरुजींना दहा रुपयांचा चहा पडला नऊ लाखांना!

प्रतिनिधी

मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी बसस्थानक परिसरात उभ्या चारचाकी वाहनातून तब्बल ९ लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली. आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत, गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. संतोष मदनलाल लद्दड असे शिक्षकाचे नाव असून त्यांनी आज मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून ९ लाख रुपयांची रक्कम काढली. त्यांनतर दोघा अज्ञातांनी त्यांच्या चारचाकीचा बेमालूमपणे दुचाकीने पाठलाग सुरू केला .

देऊळगाव माळी येथे मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले असता त्यांनी गाडीत ठेवलेली रोकड अज्ञातांनी पळवली. हा प्रकार लक्षात येताच संतोष लद्दड हादरले. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले असता, दुचाकीस्वार दिसून आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस ठाण्याचे राजेश शिंगोटे करत आहेत. इतरत्र नाकाबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026