• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! माळेगावमधील अभियांत्रिकेच्या विध्यार्थ्यांनी केलेल्या शोधप्रकल्पाचे उद्घघाटन .
Image

बारामती ! माळेगावमधील अभियांत्रिकेच्या विध्यार्थ्यांनी केलेल्या शोधप्रकल्पाचे उद्घघाटन .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

माळेगाव बु. येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या शोध- प्रकल्पाच्या उद्धघाटन समारंभ कार्यक्रम पार पडला याचे उद्घघाटन महेश रोकडे सर मुख्याधिकारी बारामती यांच्या हस्ते करण्यात आले. मिशन क्लीन सीटी अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेत शिवनगर विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातील टिम इको थ्रेडच्या शोधप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभ करण्यात आले.

शिवनगर कॉलेजच्या टिम इको थ्रेड च्या विद्यार्थानी कॉटन बॅग वेन्डींग मशीन हा शोध प्रकल्प तयार करण्यात आला होता . या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टीक पिशवीला पर्यायी कापडी पिशवी देणाऱ्या यंत्राची निर्मिती केली असुन ते सर्वसामान्य व्यक्तीना घेण्यास परवडेल असे यंत्र उपलब्ध केले होते जे वापरण्यासही अगदी सोपे असून फक्त १० रू मध्ये पिशवी देणारे हे यंत्र तयार करण्यात आले आहे .

हे यंत्र इको क्षेत्र थ्रेड च्या टीम मधील ऋतुजा होळकर, फेनी बारीया, वाडकर हर्षपा, श्रावणी आगम, गौरी नवले आणि मोहमद कर्चे यांनी तयार केले आहे. या प्रकल्पाचे उद्‌घाटन आज माळेगाव मधिल नगरपंचायत समोर करण्यात आले . प्रकल्प चांगल्या रित्या पार पडावा म्हणून अमर सिंग तावरे यांनी आपले मोलाचे वेळ काढून या प्रकल्पाला टाईम दिला याचबरोबर शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या डॉ. निता दोशी यांनी या प्रकल्पाला वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्याना केले .

या प्रकल्पाच्या उद्‌घाटन प्रसंगी कॉलेजचे डॉ. मुकते सर चिफ ऑफिसर ठोंबरे सर, महेश रोकडे सर, मिशन क्लिन सिटी चे हाके सर, सत्यवान गायकवाड सर, नानासाहेब शितोळे सर आदित्य भुतकर, गवई सर, ओंकार जाधव सर, गोरक्षनाथ सर, वयाल सर, अमर सींग वावरे सर, वर्षा इंगळे मॅडम, डॉ निता दोशी मॅडम व पिंगळे मॅडम आदी मान्यवर उपस्थीत होते.

Releated Posts

मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान २०२५–२६ संपन्न

सोमेश्वरनगर :सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “रस्ते सुरक्षा…

ByBymnewsmarathi Dec 23, 2025

बेपत्ता झालेल्या दोन युवकांचा शोध घेण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश.

प्रतिनिधी. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 274/2025 BNS 137(2) मधील मुले 1) शुभम गणेश जाधव वय…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी पुणे, दि.२०: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर…

ByBymnewsmarathi Dec 20, 2025

सोमेश्वर’चे अनुदान धोरण फसवे; सभासदांची दिशाभूल थांबवा – शेतकरी कृती समितीचा कारखाना प्रशासनावर हल्लाबोल

​प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने अलीकडेच जाहीर केलेले उसाचे अनुदान धोरण हे पूर्णपणे फसवे असून याद्वारे ऊस…

ByBymnewsmarathi Dec 16, 2025