Image

दुचाकी चोर १२ तासांत अटकेत

प्रतिनिधी

रस्त्यालगत उभी केलेली दुचाकी चोरून तिची विक्री करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मुलुंड पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील दोन दुचाकींसह एक रिक्षा हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुलुंडच्या इंदिरानगर येथे राहणारे हरीश सिंधराजन यांनी ९ मार्च रोजी त्यांची दुचाकी घराजवळ उभी केली होती. मात्र अज्ञात चोरांनी ही दुचाकी घेऊन पोबारा केला. याबाबत हरीश यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण ताब्यात घेतले. यावेळी काही जण एका रिक्षाला बांधून ही दुचाकी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचा शोध सुरू केला. ही रिक्षा गोवंडी परिसरातील असल्याचे उघड होताच पोलीस पथक तेथे दाखल झाले.

संशयीत रिक्षा परिसरातून जात असताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करून गोवंडी शिवाजी नगर येथून आवेश कुरेशी (१९) आणि मेहफुज शेख (२१) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील एक रिक्षा आणि दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.

Releated Posts

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

सहकारनगरातील पद्मावती परिसरात मध्यरात्री वाहनांची तोडफोड, तब्बल १५ वाहनांचे नुकसान

प्रतिनिधी पुणे – सहकारनगरमधील पद्मावती परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

ByBymnewsmarathi Jan 22, 2026

बीडमध्ये जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह कारमध्ये आढळला!!

प्रतिनिधी बीड येथील वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयात कार्यरत राज्य कर निरीक्षक सचिन नारायण जाधवर (वय ३५)…

ByBymnewsmarathi Jan 18, 2026