बारामती, दि. १४: जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अष्टावधानी संतुलन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलीचे भिगवण रोडवरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव,बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, फाउंडेशनचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे, आदी उपस्थित होते.
फाउंडेशनच्यावतीने तालुक्यातील १०० दिव्यांग नागरिकांना सुमारे ५० लाख रुपयांच्या तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलीचे वाटप करण्यात आले. त्यापैकी आज ५ दिव्यांग नागरिकांना प्रातिनिधिक स्वरुपात तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आले.