• Home
  • क्राईम
  • आरोपीनेच पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबला, दुसऱ्याला लात मारली
Image

आरोपीनेच पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबला, दुसऱ्याला लात मारली

प्रतिनिधी

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातू (मेयो) पसार होण्यासाठी आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबला तर दुसऱ्याला गुप्तांगावर लात मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुस्ताक उर्फ मुन्ना पटेल वल्द अहमद पटेल (४८) रा. प्रधानमंत्री आवास योजना, संघर्षनगर, यशोधरानगर, नागपूर असे आरोपीचे नाव आहे. तहसील पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपीवर सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो पोलीस कोठडीत होता. १३ मार्चला पोलीस कोठडीची तारीख संपत असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मोहनसिंग ठाकूर आणि त्यांचे सहकारी मेयो रुग्णालयात घेऊन गेले. येथे आरोपीने वरिष्ठांकडेच तपासणीचा आग्रह धरला. शिविगाळही सुरू केली. मोहनसिंग ठाकूर आरोपीची समज काढत असतानाच त्याने धक्का मारत पळण्याचा प्रयत्न केला. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला पोलीस बुथमध्ये आणले. येथेही आरोपीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चावा घेतला व त्याच्या गुप्तांगावर लात मारली. मोहनसिंग ठाकूर यांना तर गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी आरोपीला मागे ओढल्याने अनुचित घटना टळली. या प्रकरणात ठाकूर यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने रागाच्या भरात स्वत:चे डोके भिंतीवर आपटून जखमी केले व पोलिसांनीच मारहाण केल्याचा आव आणत या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026