प्रतिनिधी.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी
आज दिनांक १७ मार्च २०२४ रोजी संपूर्ण देशामध्ये असाक्षरांची परीक्षा सकाळी दहा ते पाच या वेळात घेण्यात आली.
सदर परीक्षेसाठी निरीक्षक म्हणून केंद्र शासनातर्फे
प्रदीप हेडाव- अवर सचिव शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली
सौ सुवर्णा फणसे मॅडम- उपशिक्षणाधिकारी योजना कार्यालय पुणे
संतोष दुर्गाडे साहेब- समन्वयक योजना कार्यालय पुणे
राजकुमार बामणे साहेब- गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती भोर
यांनी बारामती तालुक्यातील नवभारत साक्षरता अंतर्गत श्री बा. सा. काकडे दे, विद्यालय, निंबुतपरीक्षा सेंटरला भेट दिली. या वेळी पंचायत समिती बारामती, विस्ताराधिकारी मा. आगवणे मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व केंद्र संचालक दिपाली ननावरे,केन्द्र समन्वयक दगडे सर,घाडगे सर, भगत सर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा यथोचित असा सन्मान व सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील या नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. विजय सूर्यवंशी यांनी तर डाटा एन्ट्री चे काम श्री.सागर काकडे यांनी पाहिले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी मदत केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सतीशभैय्या काकडे दे.,उपाध्यक्ष मा.श्री.भीमराव बनसोडे व मानद सचिव मा.श्री.मदनराव काकडे दे.यांनी शुभेच्छा दिल्या…