बारामती ! वडगाव निंबाळकर (बंगला झोपडपट्टी) येथे कचरा गाडी येत नसल्याने कचऱ्याचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष्य? .

Uncategorized

प्रतिनिधी – फिरोज भालदार

वडगाव निंबाळकर यथे ग्रामपंचायत कचरा गाडी ही दररोज वडगाव निंबाळकर (बंगला झोपडपट्टी) या ठिकाणी येत नसल्याने बंगला झोपडपट्टी येथील नागरिक हे त्यांच्या घरातील कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याचे दृश्य दिसून येत आहे . बंगला झोपडपट्टी याठिकाणी कचरा गाडी रोज येत नसल्याने महिला संताप व्यक्त करीत आहेत .

हा कचरा असेच घरात ठेवला तर त्या कचऱ्याचा दुर्गंध सुटून याचे दुष्परिणाम घरातील लहान लहान मुलांवर पडत असल्याचे दिसत आहेत . बंगला झोपडपट्टी येथे कचरा गाडी आली की कधी निघून जाते ते कळत नाही असे महिलांकडून सांगण्यात येत आहे . मागील अनेक दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्न नागरिकांना सतावत आहे . या समस्येवर उपाययोजना करन्याची आवश्यकता आहे . मात्र ग्रामपंचायत व स्थानिक प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष्य करीत असल्याचे दिसून येत आहे .

कचरा गाडी प्रतेकाच्या घरी जाऊ शकत नाही तर कमीत कमी जेथे जास्त प्रमाणत घर आहेत त्या ठिकाणी जाऊन १० मिनिट थांबू शकत नाही का ? अश्या प्रकारे सर्वांना त्याठिकाणी जाऊन कचरा हा कचरा गाडीत टाकता येईल अशी व्यवस्था ही वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ने करावी व नियमित बंगला झोपडपट्टी येथे कचरा गाडी यावी ही वडगाव निंबाळकर बंगला झोपडपट्टी ग्रामस्थांची मागणी आहे .

बंगला झोपडपट्टी येथे कचरा गाडी येत नसल्याने व गाडी येईल म्हणून जो कचरा घरात साठउन ठेवला व सार्वजनिक ठिकाणी टाकला जातो. यामुळे आजाराचे प्रमाण वाडले असल्याचे चित्र दिसून येत आहे जर हे असेच चालू राहिले तर या सर्व गोष्टींना जबाबदार कोण ? .