• Home
  • क्राईम
  • खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…
Image

खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…

प्रतिनिधी

जरीपटका ठाण्यांतर्गत २३ दिवसांपूर्वी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी लिव्ह इन पार्टनरने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता.

मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. गळा आवळून हत्या आणि मृत्यूपूर्वी झटापट झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले.पोलीसी खाक्या दाखवताच प्रियकराने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. गंगाधर अर्जुन घरडे (४८) रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गंगाधर पेंटिंगचे काम करतो. १ मार्चच्या रात्री गंगाधरने त्याची प्रेयसी नीतू (३४) हिची गळा आवळून हत्या केली. रात्रीतून तिचा मृतदेह घराच्या अंगणातील सीताफळाच्या झाडाला दोरी बांधून लटकवला. २ मार्चच्या सकाळी त्याने नीतूने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. नीतूच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. नीतूच्या शरीरावर काही जखमा होत्या. चौकशीत नीतूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पहिल्या पतीपासून तिला दोन मुली होत्या. मात्र, भांडणामुळे २०१७ मध्ये ती पतीपासून वेगळी झाली. ती स्वत: काम करून उदरनिर्वाह चालवत होती. २०१९ मध्ये तिने गंगाधरशी लग्न करीत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर ती गंगाधरसोबत राहू लागली. काही दिवसानंतर नीतूने कुटुंबीयांना गंगाधर आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुलीही आहेत. तसेच तो दररोज दारूच्या नशेत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याची माहिती दिली.

पोलिसांनाही घटनेबाबत संशय होता. उत्तरीय तपासणी अहवालातून नीतूचा मृत्यू गळफास लावल्याने नाहीतर गळा आवळण्यात आल्याने झाला आहे. तिच्या शरीरावरील जखमांवरून मरण्यापूर्वी तिला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिला झाडाला लटकवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून गंगाधरला अटक केली आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026