• Home
  • क्राईम
  • गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Image

गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधी

एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या भावाकडे १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा-१ मधील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास टोकळे असे या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे गृहरक्षक दलात कार्यरत असून भाईंदर येथे राहतात. फिर्यादीच्या भावाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा १ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकळे (४१) यांच्याकडे होते. या प्रकरणात फिर्यादीच्या भावाला जामीन मिळवून देण्यासाठी तसेच कागदपत्रे आरोपीच्या बाजूने तयार करण्यासाठी टोकळे यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सापळा लावून लाच मागितल्याचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र लाचेच्या रक्कम स्विकारणाच्या वेळी टोकळे यांना संशय आल्याने ते आले नव्हते. मात्र लाच मागितल्याचा पुराव्याच्या आधारे बुधवारी रात्री उशीरा काशिमिरा पोलीस ठाण्यात टोकळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अधिनियम १९८८ ( संशोधन२०१८) च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन थोरात यांनी दिली.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026