• Home
  • क्राईम
  • कोथरूडमध्ये पोपट विकणारे तिघे अटकेत, दोन पोपट वन विभागाकडून जप्त
Image

कोथरूडमध्ये पोपट विकणारे तिघे अटकेत, दोन पोपट वन विभागाकडून जप्त

प्रतिनिधी

पहाडी पोपट विक्रीसाठी आलेल्या तिघांना वन विभागाने कोथरुड भागात पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले आहेत. पियूष दत्तात्रय पासलकर (वय २१, रा. कर्वेनगर),यश रमेश कानगुडे (वय २१), सौरभ कोडिंबा झोरे (वय १९, दोघे रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पौड रस्त्यावरील लोहिया आयटी पार्क परिसरात पासलकर, कानगुडे, झोरे पहाडी पोपट (ॲलेक्झांड्रियन) विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला रविवारी मिळाली.

त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप संकपाळ, वनरक्षक डाके आणि पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन पहाडी पोपट जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी साताऱ्यातील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सहकार्य केले.

पहाडी पोपट बाळगणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत प्रतिबंधित आहे. पहाडी पोपट बाळगणे, विक्री, तसेच शिकार केल्यास सात वर्षांची शिक्षा तसेच दहा हजार रुपये दंड अशी तरतूद आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026