• Home
  • क्राईम
  • आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा
Image

आयटी हब हिंजवडीत फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांनी टाकला छापा

प्रतिनिधी

आयटी हब असलेल्या हिंजवडीत एका फ्लॅटमध्ये चालत असलेल्या वेश्याव्यवसायाचा पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीत फ्लॅटमध्ये दोन महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. आयटी हब असल्याने हिंजवडीत उच्चभ्रू लोक राहतात किंबहुना वावरतात. याचा फायदा घेऊन माऊली क्लासिक इमातीच्या पहिल्या मजल्यावर मारूंजी येथे वेश्या व्यवसाय केला जात होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका केली असून महिला आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक विभागाने केली आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घरफोडी व मोटारसायकल चोरी प्रकरण उघड

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत घरफोडी व मोटारसायकल…

ByBymnewsmarathi Mar 25, 2026

नागरीकांचे 4 लाख 11 रुपये किंमतीचे हरविलेले एकुण 18 मोबाईलचा शोध घेवुन मुळ मालकांना दिले परत, माळेगाव पोलीस ठाणेची कामगिरी

प्रतिनिधी पुणे ग्रामीण जिल्हयातील नागरीकांचे हरविलेल्या मौल्यवान किंमती वस्तु/मालमत्ता संदर्भाने पोलीस ठाणेस दाखल असलेल्या तक्रारींचे अनुषंगाने शोध घेवुन…

ByBymnewsmarathi Mar 1, 2026

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026