• Home
  • क्राईम
  • धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून
Image

धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून

प्रतिनिधी

वडगाव शेरी भागात मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचा मुलीने बनाव रचला. मुंबईतील नातेवाइकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे.

मंगल संजय गोखले (वय ४५, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत गोखले यांचे नातेवाईक विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मुलीसह तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल गोखले यांच्या बॅंक खात्यातून मुलीने मित्राच्या मदतीने परस्पर पैसे काढले. ही बाब आईला समजल्यानंतर ती रागवेल, अशी तिला भीती होती. तिने आई झोपेत असताना तिच्या मित्राला घरातील हातोडा दिला. यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने वार करून जखमी केले. तसेच मुलगी योशिताने आईचे स्कार्फने तोंड दाबून धरले. हा प्रकार कोणाला कळू नये, यासाठी आई पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा बनाव रचला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत माने तपास करत आहेत.

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026