• Home
  • क्राईम
  • इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश
Image

इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह रोखण्यात बाल आयोगाला यश आले. आतापर्यंत जिल्ह्यात वर्षभरात १० बालविवाह रोखण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथे १६ वर्षाच्या मुलीचा विवाह रायगड नगरातील एका युवकाशी होणार होता. याची माहिती मिळाल्यानंतर एल्गार सामाजिक संघटनेचे भगवान मधे यांनी बाल आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत आयोगाकडून शहानिशा करण्यात आली असता तक्रारीत तथ्य आढळून आले.

याविषयी बाल आयोगाच्या सायली पालखेडकर यांनी, माहितीची खातरजमा केली असता मुलगी अल्पवयीन म्हणजे नववीत शिकत असल्याचे सांगितले. पालकांकडून वेळेवर लग्नाचे स्थळ बदलण्यात आले. बाल आयोगाकडून मुलीचे आणि तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. आपली चूक लक्षात येताच त्यांनी बालविवाह थांबवत असल्याचे मान्य केले.

आतापर्यंत इगतपुरी तालुक्यात चार तर जिल्ह्यात १० बालविवाह रोखले गेले आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर आशा, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील सर्वजण एकत्रित काम करत आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागात कायद्याविषयी असणारे अज्ञान, गरीबी, मुलाकडून टाकण्यात येणारा दबाव यामुळे बालविवाह होत असल्याचे सांगितले जाते. बालविवाह केल्यास पालकांना कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते, कमी वयात विवाह केल्याने मुलीला भविष्यात कोणत्या आरोग्यविषयक समस्यांना त्रास द्यावा लागू शकतो, याविषयी अधिक मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असल्याचे निष्पन्न होत आहे. यासाठी सामाजिक संस्था, संघटना, युवावर्ग यांची मदत घेता येऊ शकते, असाही मतप्रवाह आहे

Releated Posts

कौटुंबिक वादातून दोन गटात झालेल्या हाणामारी मध्ये 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल करून 08 जणांवरती अटकेची कारवाई करून न्यायालयीन कोठडीत रवानगी

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजे पूल बस स्टॅन्ड येथे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी बोलावून घेऊन फिर्यादी व…

ByBymnewsmarathi Feb 17, 2026

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रेयसीसह तिघांविरुद्ध बारामती पोलिसांत गुन्हा दाखल

प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, ब्लॅकमेलिंग आणि सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन…

ByBymnewsmarathi Feb 16, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय…

ByBymnewsmarathi Feb 2, 2026